बाळा जो जो रे कुलभूषण । श्रीनंदनंदना - Bala jo jo re shri krishna lyrics

‘बाळा जो जो रे कुलभूषण । श्रीनंदनंदना ।। निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ।। बाळा ।।धृ।। - Bala jo jo re shri krishna lyrics

 0  13292
बाळा जो जो रे कुलभूषण । श्रीनंदनंदना - Bala jo jo re shri krishna lyrics

‘बाळा जो जो रे कुलभूषण । श्रीनंदनंदना ।।
निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ।। बाळा ।।धृ।।

जन्मुनि मथुरेत यदुकुळ । आलासी वनमाळी ।।
पाळणा लांबविला गोकुळीं। धन्य केले गौळी ।। बाळा जो जो रे ।। १ ।।

बंदीशाळेत अवतरूनी । द्वारे मोकलुनी ।।
जनकशृंखला तोडूनी । यमुना दुभंगोनी ।। बाळा जो जो रे ।। २ ।।

मार्गी नेतांना श्रीकृष्ण मेघनिवारणा ॥
शेष धांवला तत्क्षणी । उंचावूनी फणा ।। बाळा जो जो रे ।। ३ ।।


रत्नजडित पालख । झळके अमोलिक ।।
वरती पहुडले कुलतिलक । वैकंठनायक।। बाळा जो जो रे ।। ४ ।।

हालवी यशोदा सुन्दरी । धरूनि हाती ज्ञानदोरी ।।
पुष्ये वर्षिली सुरवरी। गर्जति जयजयकारी ।। बाळा जो जो रे ।। ५ ।।

विश्वव्यापक यदुराया । निद्रा करी बा सखया ।।
तुजवरी कुरवंडी करूनियां । सांडिन मी निज काया।। बाळा जो जो रे ।। ६ ।।

गर्ग येऊनि सत्वर । सांगे जन्मांतर ।।
कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ।। बाळा जो जो रे ।। ७ ।।

विश्वव्यापी हो बालक दुष्ट दैत्यांतक ।।
प्रेमळ भक्तांवा पालख । श्री लक्ष्मीनायक ।। बाळा जो जो रे ।। ८ ।।

विष पाजाया पूतना । येतां घेई प्राणा ।।
शकटासुराशी उताणा । पाडिले लाधे जाणा ।। बाळा जो जो रे ।। ९ ।।

उखळा बांधता मातेनें । रांगतां श्रीकृष्ण ।।
यमलार्जुनाचे उद्धरण । दावानळ प्राशन ।। बाळा जो जो रे ।। १० ।।

गोधन पखितां आळविला । कालिया मर्दीला ।।
दावानळ वन्ही प्राशिला । दैत्यविध्वंस केला ।। बाळा जो जो रे ।। ११ ।।

इंद्र कोपतां धावुन । उपटी गोवर्धन ।।
गाई गोपाळां रक्षुन । केले वनभोजन ।। बाळा जो जो रे ।। १२ ।।

कालिंदी तीरी जगदीश । ब्रजवनितांशी राम ।।
खेळुनि मारिलें कंसास । चाणूरास ।। बाळा जौ०।।

ऐशी चरित्रे अपार । पावुनि भूमीवर ।।

पांडव रक्षिले सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ।। बाळा जो जो रे ।।